छत्रपती संभाजीनगर शहरात काल झालेला राडा हा पुर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, अचानक 400-500 तरुण एकाच वेळी तोंडाला रुमाल बांधून कसे काय येऊ शकतात. तसेच हे सर्व 10 मिनिटांत कसे काय होणे शक्य आहे, असा प्रश्न देखील आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी खासदार जलील यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर खासदार सांगतात बटन गॅंग यामागे आहे, तर ती बटन गॅंग कोण आहे हे खासदारांनी पोलिसांना सांगितले पाहिजे असेही आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे. तसेच या संदर्भात मी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले.
#Sambhajinagar #SanjayShirsat #Ramnavami #Aurangabad #ImtiazJaleel #Shivsena #BJP #Maharashtra #HWNews #ChhatrapatiSambhajiNagar